रावेर । रावेर तालुक्यातील एक खळबळजनक घटना समोर आलीय. लग्नाचे आमिष दाखवत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडक्यात असे की, रावेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा शाहरूख सरवर तडवी याने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर चार वेळा जबरदस्ती अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिला.
हा प्रकार पिडीत मुलीने आपल्या आईवडीलांना सांगितला. दरम्यान, पिडीत मुलीसह तिच्या नातेवाइकांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शाहरूख सरवर तडवी याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहे.
Discussion about this post