जळगाव: राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून अशीच एक घटना चोपडा मधून समोर आलीय. धुळे जिल्ह्यातील एका मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी आरोपीला अटक करून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अविनाश वेस्ता पावरा (रा. अंमलवाडी- उमर्टी, ता. चोपडा) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.
सतरा वर्षीय पीडिता ही धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असून ती सध्या बारावीचे शिक्षण घेत आहे. तिची मैत्रीण चोपडा शहरात बारावीचे शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी अविनाश पावरा याने सन २०२३ मध्ये पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीच्या रूमवर नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर २६ जून २०२५ रोजी देखील चोपडा तालुक्यातील शिरपूर रस्त्यावर निर्जळ ठिकाणी तिच्यावर पुन्हा अत्याचार केला.
हा प्रकार सहन न झाल्याने पीडितने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार नराधम अविनाश वेस्ता पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहे.















Discussion about this post