परराष्ट्र मंत्रालयात भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. सेक्शन ऑफिसर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती mea.gov.in या वेबसाइटवर दिली आहे. तुम्हाला याच वेबसाइटवरुन अर्ज करायचा आहे.
एकूण ७४ पदांसाठी ही भरती होणार असून या नोकरीसाठी इच्छुकांनी ६ जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
परराष्ट्र मंत्रालयातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ५६ पेक्षा जास्त नसावी. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.सेक्शन ऑफिसर पदांसाठी ही भरती होणार आहे. देशातील ३७ रिजनल पासपोर्ट ऑफिसेसमध्ये ही भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड २ वर्षांसाठी केली जाईल. त्यानंतर ती वाढवण्यातदेखील येऊ शकते. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगारदेखील मिळणार आहे. देशातील अनेक पासपोर्ट ऑफिसेसमध्ये या अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर हा फॉर्म भरुन तो ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. तुम्हाला हा अर्ज सेक्शन ऑफिसर , कॅडर, पीएसपी विभाह, परराष्ट्र मंत्रालय, कक्ष २६, पटियाला हाऊस, नवी दिल्ली येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला सांगण्यात येईल.
Discussion about this post