जळगाव । राज्य शासनाकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. यात विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे आदेश काढण्यात आले आहे.
या मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची बदली झाली असून त्यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नांदेड येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची जळगाव येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. असे आदेश मंगळवारी १८ मार्च रोजी सायंकाळी काढण्यात आले आहे.मीनल करनवाल या एक आयएएस अधिकारी आहे. २०१८ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत ३५ वा क्रमांक मिळवून आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. त्या उत्तराखंड येथील रहिवासी आहे.
आयएएस अधिकाऱ्याच्या बदली आदेशानुसार
१. श्रीमती आंचल गोयल (आयएएस: आरआर:२०१४) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर यांची मुंबई शहर, मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. श्री अंकित (आयएएस: आरआर:२०१९) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. श्रीमती मीनल करनवाल (आयएएस: आरआर:२०१९) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हा परिषद, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. श्रीमती कवली मेघना (आयएएस: आरआर:२०२१) प्रकल्प संचालक, आयटीडीपी, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड यांची जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. श्रीमती करिश्मा नायर (IAS:RR:२०२१) प्रकल्प संचालक, ITDP, जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. श्री रणजित मोहन यादव (IAS:RR:२०२२) सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
Discussion about this post