पुणे । महागाईने होरपळून निघणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक महागाईचा झटका बसला आहे. दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून (15 मार्च) ही दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे गायीचं दूध आता प्रतिलिटर 58 रूपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रूपयांना मिळेल.
पुण्यात कात्रज दूध संघाच्या मुख्यालयात सहकारी आणि खासगी दूध संघाची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पुण्यासह मुंबईत पिशवीतलं दूधही महागणार आहे.
आजपासून दुधाच्या किमतींवर 2 रुपयांनी दर वाढ झाली आहे. दूध संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय आमच्या खिशाला कात्री लावणारा आहे असे ग्राहकांचे मत आहे. तर आम्हाला हे परवडत नाही सर्वांनी विचार करावा, असे ही ग्राहक बोलत आहे. विक्रेत्यांच्या मते दरवाढ तर झालेली आहे, इतर गोष्टींची ही महागाई झालेली आहे. ग्राहकांना नवे दर समजावून सांगावे लागतील असे मत आहे.
Discussion about this post