जळगाव l दैनिक जनशक्ती वृत्तपत्र संस्थापक कुटुंबातील सक्रिय व्यक्तिमत्व, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे खान्देश व जालना जिल्ह्याचे माजी प्रतिनिधी मिलिंद नथ्थू पाटील रा. पत्रकार कॉलनी, जळगाव (वय ५३) यांचे आज अल्पशः आजाराने पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले.
“ब्रिज कम्युनिकेशन” या त्यांच्या फिल्म प्रॉडक्शन कंपनीने निर्मित केलेल्या ‘खान्देश रत्न’ व “दीपस्तंभ”मालिकेत खानदेशातील अनेक महारथींच्या जीवनकार्याला त्यांनी खऱ्या अर्थाने उजाळा दिला. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.तसेच शासनाच्या आणि खाजगी अशा अनेक लघुपटाची निर्मिती त्यांनी केली होती.
उद्या सकाळी त्यांच्यावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन बहिणी,मेव्हणे असा परिवार आहे.
Discussion about this post