गृह मंत्रालयात सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ आहे. गृह मंत्रालयात सिनियर कंसल्टंट पदासाठी भरती सुरु आहे. या पदासाठी अर्ज करायचा विचार करत असाल तर सर्वप्रथम वेबसाइटवर जाऊन अधिसूचना वाचावी.
सिनियर कंसल्टंट पदासाठी अर्ज करणारा व्यक्ती सेवानिवृ्त्त सरकारी कर्मचारी असावा. डेप्युटी सेक्रेटरी आणि डायरेक्टर म्हणून काम केलेले असावे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तर तुमच्याकडे एमबीए पदवी असावी. तसेच १० वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
किती पगार मिळेल?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना ७८००० ते ११८५०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे.
कसा अर्ज कराल?
तुम्हाला अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर दिसेल. हा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया, पहिला मजला, शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे पाठवायचा आहे.याचसोबत तुम्ही admn.del-cepi@govcontractor.in या मेलवरदेखील अर्ज पाठवू शकतात.
गृह मंत्रालयात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. कोणत्याही परीक्षेशिवाय चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहेत.















Discussion about this post