१०वी पास आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कोलकत्ता मेट्रो रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्ही mtp.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन बघू शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२६ आहे.
कोलकत्ता मेट्रोमध्ये १२८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही परीक्षेची गरज नाही. मेरिट लिस्टच्याआधारे तुमची निवड केली जाणार आहे.
पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असावे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करायचे आहे.
यानंतर तुम्हाला कोलकत्ता मेट्रोच्या वेबसाइटवर जाऊन mtp.indianrailways.gov.in फॉर्म भरायचा आहे.
यानंतर तुमचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
यानंतर फोटो आणि सही अपलोड करायची आहे.
यानंतर फी भरुन तुम्ही अर्ज सबमिट करा. त्याआधी एकदा प्रिंट आउट काढून ठेवा.















Discussion about this post