जळगाव: जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रथमच मोफत सर्व रोग निदान व चिकित्सा शिबीराचे आयोजन
भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल जळगाव, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय जळगाव आणि अनुपमा फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
तरी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.
सदरचे शिबीर हे दिनांक २५ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत असणार आहे.
शिबिराचे स्थळ: मैत्रेय बुद्ध विहार, यशवंत भवन, भा. बौ. महा. जिल्हा कार्यालय, वाघ नगर स्टॉप, जळगाव.
तरी गरजू नागरिकांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जळगाव तालुका शाखा, महिला तालुका शाखा व महिला शहर शाखेकडून करण्यात आलेले आहे.















Discussion about this post