जळगाव : पदोन्नतीने बदली झालेले जळगावचे मावळते पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना निरोप देण्यात आला तर नूतन पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.
मावळते पोलिस अधीक्षक एम. राजकुमार म्हणाले की, कोणत्याही घडामोडी, प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी येथे सदैव तत्पर राहणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची समर्पण भावना हेच येथील पोलिस दलाच्या यशाचे गमक आहे. यातूनच जिल्ह्यात एमपीडीए सारख्या कारवाया मोठ्या प्रमाणात होऊ शकल्या व दंगली सारख्या प्रसंगांना वेळीच नियंत्रणात आणाता आले, अशा भावना एम. राजकुमार यांनी व्यक्त केल्या.
Discussion about this post