माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे, इंजिनियरिंग डिप्लोमा पदवीधर यासाठी ही भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
माझगाव डॉकमध्ये इंजिनियरिंग डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी ३० जागा रिक्त आहेत. यामध्ये सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये ५, कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये ५, मेकॅनिकलमध्ये १० रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात इंजिनियरिंग डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. ()
इंजिनियरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदााठी १२० जागा रिक्त आहेत. त्यात सिव्हिल पदासाठी १०, कॉमप्युटर ५, इलेक्ट्रिकल २५ आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन पदासाठी १० जागा रिक्त आहे. जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट्स अप्रेंटिससाठी ५० पदे भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी बी कॉम/ बी.सी.ए/ बी.बी.ए / बी.एस.डब्ल्यू पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी १ वर्षाच्या अप्रेंटिस पदासाठी डिप्लोमाधारकाना ८००० तर ग्रॅज्युएट्सना ९००० रुपये स्टायपेंड दिली जाईल.
या नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी पात्रतेच्या आधारावर शॉर्टलिस्टिंग केले जाईल. त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी https:// mazagondock. in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. पात्र उमदेवारांची यादी ७ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल. त्यानंतर १४ फेब्रुवारीला मुलाखतीसाठी यादी जाहीर केली जाईल















Discussion about this post