माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती निघाली असून यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. माझगाव डॉकमधील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.या नोकरीसाठी तुम्ही mazagondock.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेल्या तरुणांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे.
माझगाव डॉकमधील नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी वयोमर्यादेची गणना १ नोव्हेंबर २०२४ नुसार होणार आहे.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सर्वप्रथम mazagondock.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
वेबसाइटवर तुम्हाला ऑनलाइन रिक्रूटमेंट यावर क्लिक करुन नॉन एक्झिक्युटिव्ह सेक्शनवर क्लिक करा.
यानंतर रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करावे.
यानंतर सर्व माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करावे.अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३५४ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी स्पेशल ग्रेड पदासाठी २२००० ते ८३१८० रुपये पगार मिळणार आहे. स्किल ग्रेड १ पदासाठी १७००० ते ६४३६० रुपये पगार मिळणार आहे. सेमी-स्कील ग्रेड १ पदासाठी १३२०० ते ४९९१० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावेत
Discussion about this post