नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. माझगाव डॉकमध्ये काही पदांसाठी मोठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती होणार असून यासाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. १०वी पास, आयटीआय आणि संबंधित ट्रेडमधील सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. mazgaondock.in या वेबसाइटवर जाऊन करिअर हे ऑप्शन निवडा. यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करुन नोंदणी करा. यानंतर तुम्ही आवश्यक माहिती भरा. यानंतर शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.
नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी जनरल, ओबीसी, EWS गटातील उमेदवारांना ३५४ रुपये भरावे लागणार आहे.तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या नोकरीसाठी स्पेशल ग्रेड, स्कि ग्रेड आणि सेमी स्किल ग्रेड अशा पदानुसार विभागले जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १३२०० ते ८३१८० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
Discussion about this post