नागपूर : नागपूरच्या बाजारगावमध्ये एक्सप्लोझिव्ह निर्मिती करणाऱ्या एका फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात एकुण ९ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही जण आत अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट झालेल्या सोलार या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्फोट झाला त्यावेळी कंपनीत काही कर्मचारी काम करत होते. यात नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये दारुगोळा तयार करण्याचं काम केलं जात. हा दारुगोळा भारतीय सैन्याला पुरवला जातो. दारूगोळा बनवण्याचे काम सुरु असतानाच काही वेळापूर्वी हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील कंपनीबाहेर झाली आहे. राष्ट्रवादीचे नेत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील घटनास्थळी रवाना झाले आहे.
Discussion about this post