जळगाव । लग्न जुळवले म्हणून एका महिलेला एक लाख मोजल्यानंतर मुलाचे थाटामाटात लग्न केले. सर्वजण थकलेले असल्याने रात्री कुटुंब गाढ झोपेत होते. हीच संधी साधत दुसऱ्याच दिवशी पहाटे नववधू व तिची मैत्रीण लग्नात बनवलेले सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. हा प्रकार जळगावातील जमुनानगरात घडली.
मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसांत २२ एप्रिल रोजी लग्न जुळवणाऱ्या पूजा विजय माने (वय ३२, रा. महाडीकवाडी, सांगली), वधू नंदिनी राजू गायकवाड (रा. आकोअ फाइल, आकोला), तिची मैत्रीण नीता अर्जुन गणवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात सुद्धा या टोळीने एका कुटुंबाला गंडवले असल्याची बाब समोर आली आहे.
मनपाचे व्हॉल्व्हमन शरद चौधरी यांना १३ फेब्रुवारी रोजी पूजा माने यांचा फोन आला. तुमच्या मुलाचा बायोडाटा मी बघितला असून, आमच्याकडे मुलगी आहे. तुम्ही मेहकर येथे येऊन मुलगी बघून घ्या असे सांगितल्यानंतर ते मेहकरला गेले. मुलगी पसंत पडल्यानंतर पूजा माने या महिलेने त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली; परंतु चौधरी यांनी आम्ही एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगत ते लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाची खरेदी केल्यानंतर १६ मार्च रोजी तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाइकांच्या उपस्थितीत मुलाचे नंदिनी गायकवाड या तरुणीसोबत विवाह सोहळा झाला. मुलीकडून पूजा माने, नंदिनीची मैत्रीण नीता अर्जुन गणवार, मावशी, मुलीचा मावसभाऊ असे हजर होते. लग्न आटोपल्यानंतर चौधरी यांनी पुजा माने हिला एक लाख रुपये दिले.















Discussion about this post