जळगाव । मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला मोठं यश मिळालं असून राज्य सरकारने अखेर सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढला आहे. पण सरकारच्या या अध्यादेशावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी निशाणा साधला आहे.
रक्ताच्या नातेवाईक शिवाय दाखला देता येणार नाही अशा प्रकारची कायदेशीर तरतूद मागास वर्ग आयोगाने अगोदरच करून ठेवली आहे, त्यामुळे सरकारचा अध्यादेशातून मराठा समाजाची फसवणूक केल्याचा दावा खडसे यांनी केला आहे.
मराठा समाजाचा प्रचंड दबाव होता आणि या दबावामुळे सरकार झुकलं. त्यादृष्टीने सरकारने हे आंदोलन यशस्वीरित्या सोडवलं असं म्हणता येईल. मात्र उद्या जर फसवणूक झाली तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही, असंही खडसे म्हणाले.
सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ही पीटिशन दाखल आहे, त्यांनतर हा निर्णय झाला असता, तर तर कायद्याच्या चौकटीमध्ये निकषांमध्ये बसवून घेतल्यासारखे वाटले असते. क्युरेटिव्ह पीटिशनचा निर्णय वेगळा आला आणि त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेश विसंगत निघाला तर सरकारच्या किए किराएवर पाणी फिरल्यासारखे होईल, असं ते म्हणाले.
Discussion about this post