मुंबई । मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज अखेर मोठं यश आलं आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून याबाबतचा अध्यादेश देखील निघाला आहेत. त्यानुसार आता कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगेसोयऱ्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान सरकारच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असून पण निर्णय घेताना आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
तसेच फडणवीस यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही
“मला अतिशय आनंद आहे की, काल जे आंदोलन, उपोषण सुरु होतं त्यावर अतिशय चांगला मार्गा निघून त्याची सांगता झाली आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने या संदर्भात अतिशय सकारत्मकता दाखवली होती. आम्हाला आज आनंद आहे की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज प्रश्न सुटलेला आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की, जो काही मार्ग आहे तो कायदेशीर काढावा लागेल, संविधानाच्या आधारावर काढावा लागेल, म्हणून आपल्याला सरसकट करता येणार नाही. पण ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्त नात्यातील लोकांना आपल्याला ते देता येईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Discussion about this post