बीड | राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत असून याचा फटका राजकीय नेत्यांना बसू लागला आहे. मराठा आरक्षणासाठी आमदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी सातत्याने आंदोलकांकडून होत होती. त्यात बीडच्या गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे.
आमदार लक्ष्मण माधवराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलंय की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी म्हटलं आहे. लक्ष्मण पवार हे गेवराईतील भाजपाचे आमदार आहेत.
गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या कालखंडात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याठिकाणी प्रशासक आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आमदार, खासदार ही पदेच शिल्लक आहेत. आज लोकांचे प्रश्न खूप आहेत. हे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही बाहेर पडलो नाही तर लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ करू नका. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नका असं आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मराठा समाजाला केले.
Discussion about this post