जळगाव । महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याची उद्याची ३० डिसेंबर शेवटची तारीख असून यामुळे जळगावच्या मनपामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आज आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटातील अनेक बड्या नेत्यांनी आपले अर्ज दाखल केले.
यामध्ये महानगरप्रमुख संतोष पाटील, सागर सोनवणे, श्रीमती दारकुंडे आणि माजी महापौर विष्णू भंगाळे यांसारख्या मातब्बर चेहऱ्यांचा समावेश आहे. या नेत्यांनी आपल्या समर्थकांसह पालिकेत प्रवेश केला आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार किशोर पाटील यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, “जळगाव महानगरपालिकेची निवडणूक महायुती पूर्ण ताकदीने लढणार आहे. भाजप आणि शिवसेनेची युती भक्कम असून, येणाऱ्या निकालात महायुतीचाच झेंडा महापालिकेवर फडकलेला दिसेल. शहराच्या विकासासाठी जनता महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मते देईल.”















Discussion about this post