मुंबई : अल निनो आणि चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेल्याचं सांगितलं जात आहे. मान्सून लांबल्याने बळीराजाची चिंता वाढली असून पावसाची आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. अजूनही महाराष्ट्रात पाऊस आला नाही. मान्सून कधी हजेरी लावेल याची प्रतीक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय.
मान्सून 27 जूनपर्यंत येईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. पावसाच्या अंदाजावर पाणी; राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज आहे. मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. नैऋत्य मोसमी वारे १५ जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज फोल ठरला असून, आता २३ जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने गुरुवारी वर्तवली.
मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. नैऋत्य मोसमी वारे १५ जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज फोल ठरला असून, आता २३ जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये
२३ जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात मोसमी पाऊस सुरू होण्यास पोषक वातावरण तयार होईल, अशी माहिती हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.















Discussion about this post