पुणे : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मान्सून राज्यात दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात मान्सून दाखल झाला असून राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
27 तारखेपासून ऑरेंज अलर्ट जारी
कोल्हापूर, नाशिक, सातारा जिल्ह्यात उद्यापासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिन्ही जिल्ह्यात घाट परिसर असल्यामुळे अधिक पावसाची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस तिथं ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 27 तारखेपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून जारी करण्यात आली आहे.
पावसामुळे रोपांना काही प्रमाणात दिलासा
कालपासून नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कारण तिथल्या काही शेतकऱ्यांनी पाणीसाठी शिल्लक असल्यामुळे कपाशीची लागवड केली होती. कडकं उन्हामुळे पीक करपत असल्याचे पाहून शेतकरी मोठ्या चिंतेत होत. कालच्या पावसामुळे रोपांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Discussion about this post