पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
यंदा मान्सून तब्बल आठ दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला होता त्यानंतर केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तमिळनाडूमध्ये मॉन्सूनने वाटचाल केली असून ईशान्येकडील बहुतेक राज्ये व्यापून मान्सूनने शनिवारी कर्नाटकमधील कारवारपर्यंत मजल मारली.
कर्नाटकमध्ये आलेला मान्सून पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
चक्रीवादळाचा धोका कायम
एकीकडे मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपला असताना, दुसरीकडे ‘बिपरजॉय’ (Cyclone) चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. येत्या २४ तासांत बिफरजॉय चक्रीवादळ रौद्ररुप धारण करणार असल्याची शक्यता आहे. याचा कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर जाणवू शकतो, मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.















Discussion about this post