पुणे: महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होणार आहे. दमान-निकोबार बेट समूहावर मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. येत्या मंगळवारपर्यंत (ता. १३) मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांवर दखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
मान्सूनचे अंदमानात वेळेआधी दाखल होण्याचे संकेत असल्याने केरळातील लवकर आगमनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणतः २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो.
तर १ जूनपर्यंत केरळमध्ये मॉन्सून डेरेदाखल होतो. यंदा १३ मे रोजी मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षीदेखील १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर केरळमध्ये दोन दिवस आधीच म्हणजेच ३० मे रोजी डेरे दाखल झालेला मॉन्सून ६ जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पोहोचला होता.
Discussion about this post