जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ४५ उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहिम विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहे. तर जळगाव शहरमधून डॉ. अनुज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी यापूर्वीच मनसेच्या 9 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यातील ठाणे व कल्याणमधून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. तर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यात 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. आता, 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे.
विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात काँटे की टक्कर असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल डोंबिवली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली होती. राज ठाकरे यांनी आपल्या 5 मिनिटांच्या भाषणात राजू पाटील यांना कल्याण ग्रामीण आणि अविनाश जाधव यांना ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती.
दुरीकडे जळगाव शहरातून डॉ.अनुज पाटील यांना उमेदवारी जाहीर झालीय.