मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करणार आहेत. युतीसोबतच दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात देखील चर्चा झाली. दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असून जागावाटपाचा फॉर्म्युला तयार झाला आहे.
कोण किती जागांवर लढणार?
शिवसेना ठाकरे गट १४५ ते १५० जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाने मनसेला साधारणपणे ६५ ते ७० जागा सोडल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १० ते १२ जागा सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आज युती आणि जागावाटपाबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
युती कुठे कुठे होणार?
मनसे अन् शिवसेना हे दोन्ही पक्ष मुंबईसह सहा महापालिकांमध्ये एकत्रित लढणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पुणे या महापालिकांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. आता उर्वरित महापालिकांमध्येही दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.















Discussion about this post