मुंबई । मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आता राज्यभरात सभा घेत आहेत. या सभेतून ते राज्य सरकारकडे वारंवार आरक्षणाची मागणी करीत आहेत. आता
आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा. येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. चालढकल करण्याचा प्रयत्न केला, तर मराठ्यांचं शांततेत सुरू असलेलं आंदोलन तुम्हाला पेलणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. ते शिवनेरी किल्ल्यावरून बोलत होते.
राठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आम्ही आरक्षणासाठी ४ दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, राज्य सरकारने ३० दिवसांचा वेळ वाढवून मागितला. त्यापुढेही आम्ही १० दिवसांचा वेळ वाढवून दिला, असं जरांगे पाटील म्हणाले.
आता राज्य सरकारला दिलेली मुदत संपत आहे. येत्या २४ तारखेपर्यंत राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा आहे. कुठलीही चालढकल करण्याचा प्रयत्न केला, तर शांततेत होणारं मराठा आंदोलन तुम्हाला पेलणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही तसूभरही मागे हटणार नाही, असंही जरांगे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
Discussion about this post