मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठे आंदोलन उभे करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात बीडच्या परळीमधील एका बड्या नेत्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी ज्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. बीडमध्ये मनोज जरांगेच्या हत्येचा कट रचण्यासाठी बैठका पार पडल्या. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतले. अमोल खुणे आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असून त्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जरांगेचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील अधिकृत भूमिका मांडतील नंतरच मी माध्यमांसमोर बोलेल तोपर्यंत मी बोलणार नाही असे गंगाधर काळकुटे भूमिकेवर ठाम आहेत.















Discussion about this post