बीड । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील आष्टीजवळील अंबोरा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना त्यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. जामनेरच्या 15 रुपयांचा पट्टा घालणाऱ्याला मी नीट केले आहे, असा टोला त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे.
“भाजपला आमचा कधीही विरोध नव्हता. मात्र, आमच्या माय लेकीचे डोके त्यांनी फोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गोधड्या घेवून महाराष्ट्रात मुक्कामी आहेत. मी कोणालाही निवडून द्या म्हटलेले नाही,” असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
“मराठा समाज ताकतीने एकत्र आला आहे. त्याचीच धास्ती देशाने घेतली आहे. त्यांना मराठ्यांच्या एकीची भीती एवढी वाटते आहे की चांगल्या चांगल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत. मराठा एक झाला म्हणून राज्यात पाच टप्प्यात निवडणूक लागली. दुसरीकडे एक आणि दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. हाच मराठ्यांचा विजय आहे,” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.















Discussion about this post