मुंबई । मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक झाले असून ते मुंबईला जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे पाटील शेकडो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. राज्यभराच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून मराठा बांधव हे थेट आता मुंबई गाठत असल्याचे चित्र आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. अंतरवाली सराटीवरून निघालेला जरांगेचा मोर्चा आज सकाळी जुन्नरमध्ये दाखल झाला. या मोर्चादरम्यान हृदविकाराचा झटका येऊन जरांगेंच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. सतिश ज्ञानोबा देशमुख (वय ४० वर्षे) असं या मृत आंदोलकाचे नाव असून त्यामुळे एकच खळबळ उडाली. याआधी जरांगेंचा मोर्चा निघण्यापूर्वी मराठा आरक्षणासाठी लातूरमधील एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोन्ही घटनांवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी ते जुन्नरमध्ये दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्यासंख्येने किल्ले शिवनेरी येथे गर्दी केली होती. या मराठा बांधवांमधील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतिश ज्ञानोबा देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासोबत मुंबईला जाणार होते. पण मोर्चा मुंबईच्या दिशेने निघण्यापूर्वीच त्यांचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.















Discussion about this post