मुंबई । मराठा आरक्षणावरुन राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. मागील काही दिवसापूर्वी मराठा समाजासा आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे, प्रचार, उपोषणं आणि आंदोलन करण्यात आले. इतकंच काय तर काही लोकांकडून आत्म्हत्यासारखं टोकाचं पाऊल देखील उचललं जात आहे. तरी देखील सरकारने आद्यपही कोणता ठोस निर्णय सांगितला नाही.
यातच मराठा तरूणांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. त्यांनी ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे.मराठ्यांच्या पोरांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. विनाकारण पोरांना अडकवलं जात आहे. पोरं आणि जात खचली पाहिजे असा डाव आहे.
ओबीसी नेत्यांकडून हे होत आहे. जातीतील पोरं मोठी होऊ नये म्हणून ताकदीने प्रयत्न सुरू आहेत.सरकारने लक्ष द्यावं. सरकारने लक्ष दिले नाही तर मराठ्याच्या नेत्यांनी करावं. उद्रेक करणारे गुंतवू नका असं आमचं मत नाही. अर्थाचं अनर्थ करू नका, असं मनोज जरांगे म्हणालेत.















Discussion about this post