मुंबई । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच आक्रमक झाले. एकेरी उल्लेख करत फडणवीस यांच्या गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यानंतर काल ते फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवास सागर बंगल्यावर निघाले.
“तुझ्यात दम असेल, तर सागर बंगल्यावर ये. तुला जातीवर आव्हान केलं होतं. तू बामणाचा असला, तरी मी खानदानी मराठा आहे. अरे दम लागतो. घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला, अशा शब्दात जरांगे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला.
“संचारबंदी का लावली? कारण काय? अंबड तालुक्यात संचारबंदी लावली म्हणजे आम्हाला मुंबईत येऊ द्यायच नाहीय. फडणवीसांनी रात्री बंदुकीची फोटो टाकला. दम होता तर थांबायच, आम्हाला येऊ द्यायच नाही. हा प्रयोग रात्रीच होणार होता. मराठ्यांनी डाव यशस्वी होऊ दिला नाही. थोड पुढे गेल्यावर होणार होता. म्हणून सकाळी निघण गरजेच होतं. कोणाकडे काहीच साहित्य नव्हतं. देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही. पोलिसांच्या आडून करतायत सगळं. एक-दोन तासात निर्णय घेऊ” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आजच्या आज सग्या सोयऱ्याची अमलबजावणी करा. तुझ्याशिवाय कलेक्टर संचारबंदीचा आदेश काढू शकत नाही. विचार करुन पुढच पाऊल टाकाव लागणार. “फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. एकही मराठा अडचणीत येता कामा नये. मराठ्यांनी शांत रहाव, माझ आवाहन आहे. दोन तासात निर्णय घेणार आहे. बैठक अंतरवली सराटीत होईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Discussion about this post