जालना | मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. पाच महिने झाले तरी फडणवीस गुन्हे मागे घेत नाही. तुम्हाला बळी पाहिजे तर मी माझा बळी देण्यास तयार आहे. मी सागर बंगल्यावर येण्यास तयार आहे. माझा बळी घ्या असं मनोज जरांगे म्हणाले
देवेंद्र फडणवीस कोणाला मोठे होऊ देत नाही. पक्षातील अनेक लोकांना त्यांनी संपवले. महादेव जानकर यांनाही त्यांनी मोठे होऊ दिले नाही. त्यांच्या बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही. खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे. कोणाच्या आडून हल्ले करु नये, असा घणाघातही मनोज जरांगे पाटील यांनी केला.
यावेळी लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना शांत होण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही मनोज जरांगे आक्रमक होते. त्यामुळे व्यासपीठावर काही जण आले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर मनोज जरांगे ऐकवण्यास तयार नव्हते.
Discussion about this post