नवी दिल्ली । माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.ते ९२ वर्षाचे होते. एम्समध्ये आज रात्री ९.५१ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची आज रात्री आठ वाजता तब्येत खालावली होती. त्यांना श्वसानाचा त्रास होऊ लागला होता, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे.मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.
सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.
Discussion about this post