जळगाव । मकरसंक्रांतीचा सण जळगावसह राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, आता पतंग उडवण्यासाठी बंदी असलेला नायलॉन मांजा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. यातच जळगाव शहरात शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली.
शहरातील बेंडाळे चौक ते पांझरापोळ चौक दरम्यान प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दर्शन संजय शिंपीसह एका अल्पवयीन बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघ जण चोरून नायलॉन मांजा विक्री करताना पोलिसांना आढळून आलेत. त्यांच्याविरुद्ध BNS कलम 125, 223 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम 5, 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपींच्या ताब्यातून मोनोकाइट नायलॉन मांजाच्या पाच चक्री जप्त केल्या आहेत.















Discussion about this post