मणिपूर! मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी बिघडत चालली आहे. त्यातच मणिपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 4 मे चा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दुसऱ्या बाजूचे काही लोक एका समाजातील दोन महिलांना नग्न करून रस्त्यावर फिरत आहेत. सोशल मीडियावर मणिपूरमधील या हादरवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशवासियांची मान शरमेने खाली झुकली आहे.सारेकाही पोलिसांसमोरच घडले आहे, परंतू गुन्हा ४९ दिवसांनी तर पहिली अटक ७८ दिवसांनी झाली आहे. यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पीडित महिला आदिवासी समाजाच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मणिपूर सरकार आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला विरोधक लक्ष्य करत आहेत.
मोदींनीही ही घटना 140 कोटी भारतीयांसाठी लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेत केंद्र आणि राज्याकडून केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. जर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू, असे न्यायालयाने कडक शब्दात सांगितले आहे.
नेमके काय घडलेले….
या लाजिरवाण्या घटनेची तक्रार १८ मे रोजी करण्यात आली होती. एफआयआरनुसार पिडीतांनी सांगितले की, ४ मे रोजी दुपारी ९०० ते १००० जणांच्या जमावाने थोबलमधील गावावर हल्ला केला. ते मैतेई समाजाचे होते. घरांना आगी लावण्यात आल्या. घरातील पैसे, दागिने यासह किंमती वस्तू लुटण्यात आल्या.
हल्ला झाल्याचे समजताच तीन महिला त्यांचे वडील आणि भावासोबत जंगलाकडे पळाले. पोलिसांच्या टीमने त्यांना वाचविले आणि पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते. तेवढ्यात जमावाने पोलिसांना थांबविले आणि त्यांच्याकडून त्या महिला आणि त्यांच्या वडील-भावाला हिसकावून घेतले. पोलिस ठाणे तेथून दोन किमीवर होते. पोलिसांच्या समोरच जमावाने वडिलांची हत्या केली. यानंतर तिथेच महिलांना कपडे काढण्यास मजबूर करण्यात आले. एका महिलेचे वय २१ वर्षे, दुसरीचे ४२ आणि तिसरीचे ५२ वर्षे होते.
त्या निर्वस्त्र महिलांना जमावाच्या पुढे चालण्यासाठी दबाव आणला गेला. यावेळी त्यांच्यासोबत छेडछाड करण्यात येत होती. २१ वर्षांच्या तरुणीवर जमावाने सामुहिक बलात्कार केला. तिच्या भावाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला ठार मारण्यात आले. हा प्रकार घडत असताना दोन महिलांना त्यांच्या काही ओळखीच्या लोकांनी तिथून बाजुला नेत जमावाच्या तावडीतून सोडविले.
Discussion about this post