मुंबई । राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओ कोकाटे सभागृहात दिसत असून, ते रमी खेळत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनही दिला आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘जंगली रमी पे आओ ना महाराज.. खरंतर सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना देखील, सभागृहात काहीच काम नसल्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याची वेळी येत असावी’ असा खोचक टोला त्यांनी पोस्ट शेअर करत दिला आहे.
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
‘कभी गरीब किसानो की खेती पर भी आओ ना महाराज’
‘कभी गरीब किसानो की खेती पर भी आओ ना महाराज’ ! रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्त आवाज ऐकू येईल का?, असा सवाल रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, ‘कधीतरी शेतीवर या महाराज! खेळ थांबवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या..’ असंही रोहित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, व्हायरल व्हिडिओवर कोकाटे काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Discussion about this post