पाचोरा । एकीकडे स्थानिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून मात्र दुसरीकडे पाचोरा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. आमदार किशोर पाटील यांचे स्वबळाचे आव्हान स्वीकारत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनीही पाचोऱ्यात भाजप स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे.
बुधवारी पाचोऱ्यात भाजपचा मेळावा पार पडला या मेळाव्यात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘मी पाचोरा मतदारसंघात लक्ष घातले आहे.’, असे सूचक इशारा पाटील यांना दिला.मंगेश चव्हाण यांनी एकेरीवर येत किशोर पाटील यांना थेट आव्हान दिले. ते म्हणाले, आमदार पाटील यांनी चाळीसगाव नगरपालिकेत एक नगरसेवक निवडून आणून दाखवावा. तसे केल्यास मी पाचोर्यात येऊन त्यांचा सत्कार करीन.
पगार काय बोलता काय?
पुढे बोलताना मंगेश चव्हाण म्हणाले, आमदारांचा पगार काय? ते बोलतात काय? आता तर ते थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करू लागले आहेत. तलाठी आणि तहसीलदारांना दम देऊ लागले आहेत.जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात भाजप मजबूतपणे उभा आहे. पालिका निवडणुकीत आम्हाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जे डोक्यात घेतात ते पूर्ण करतात, असा सूचक इशारा त्यांनी दिला.















Discussion about this post