मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे पडसाद मनसेमध्ये उमटू लागले आहे. त्यांच्या या भूमिकेच्या विरोधात मनसे सरचिटणीस कीर्तीकुमाकर शिंदे यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. महायुती बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांना गुढी पाडव्याला घेतलेल्या सभेत जाहीर केला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
मात्र त्यांच्या या भूमिकेच्या विरोधात मनसे सरचिटणीस कीर्तीकुमाकर शिंदे यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. मनसेत पडलेली ही पहिली ठिणगी आहे.
काय म्हटले कीर्तीकुमार शिंदे यांनी
पाच वर्षांपूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राज ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होते. तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सभांना मी उपस्थित होतो. सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात ते विचार मांडत होते. २०१९ मध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली होता. आता ते पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांची कुचंबना होत आहे, असे कीर्तीकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. यामुळे सरचिटणीस पदावरुन आपण राजीनामा देत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.















Discussion about this post