महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सभा आज सायंकाळी ६ नंतर थांबणार असून त्यापूर्वी नेते मंडळींच्या प्रचार सभेचा धडाका उडाला आहे. याच दरम्यान सांगलीत प्रचार सभेत भाषण करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर घणाघाती टीका केलीय.
‘राजकारणात सगळ्यात खतरनाक भाजप आणि आरएसएस आहे. एखाद्या विषारी सापाप्रमाणे भाजप आहे. त्यामुळे त्याला मारून टाका’, असे आवाहन देखील मल्लिकार्जुन खरगेयांनी केला आहे. सांगलीमध्ये ते काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेनिमित्ताने बोलत होते.
यावेळी खरगे यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्रात चोराचे सरकार आहे. चोरांनी मिळून बनवलेले हे सरकार आहे.’, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महायुती सरकारवर केली आहे. तसेच, ‘भाजपाचे लोक खतरनाक असून आता रात्र खतरनाक आहे. त्यामुळे भाजपवाले कसे आणि कोणत्या वेशात येतील, हे तुम्हाला कळणार नाही कारण त्यांच्याकडे सत्ता आणि पैसा आहे.’,असं मत देखील त्यांनी व्यक्त केले.















Discussion about this post