बुलढाणा । बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्गांवर एक कार ट्रेलरवर धडकून झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील पाच जण ठार झाल्याची घटना घडली. यामध्ये भुसावळचे चार तर मुक्ताईनगरातील एकाचा समावेश आहे. दरम्यान अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
हे प्रवासी मारूती ईको कारने (क्र. एम एच ४६ एक्स ३१२०) प्रवास करीत होते. दरम्यान चालक साजिद अजीज बागवान याचे नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगात समोर असलेल्या मोठ्या ट्रेलरला पाठीमागून धडकली.या अपघातात वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला.
या भीषण अपघातात साजीद अजीज बागवान (३०, रा. भुसावळ), झुमा सिखधर (४६), तानिया बागवान (४२, रा. पश्चिम बंगाल, ह. मु, भुसावळ), संतोष तेजराव महाले (४०, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला. तर उर्वरित एका महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींपैकी चौघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे, तर एकाला बुलढाणा येथे हलविण्यात आले.















Discussion about this post