नंदुरबार : खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या मक्याची काढणी अनेक शेतकऱ्यांकडून पूर्ण करण्यात आली आहे. काढणी केल्यानंतर मका बाजार समितीत विक्रीसाठी आणला जात असून येथे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मका काढणीचे काम बहुतांश शेतकऱ्यांकडून करण्यात आले आहे. यामुळे नंदुरबार बाजार समितीमध्ये मक्याची आवकला सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मक्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत असते. त्यामुळे आता मक्याची काढणी सुरू झाल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी मका दाखल होवू लागला आहे. यंदा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मक्याला चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचीही काही अंशी भरपाई होत आहे.
बाजार समितीत सध्या लाल मक्याला प्रतिक्विंटल १ हजार ४८१ ते २ हजार १४२ तर सफेद मका १ हजार ९६० ते २ हजार ७८० या दरात व्यापारी खरेदी करत होते. यंदाच्या हंगामातील मकाचे हे उच्च दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका विक्रीसाठी नंदुरबार बाजारपेठेत दाखल होत आहे. दरम्यान हा दर आगामी काळात देखील टिकून रहावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.















Discussion about this post