जळगाव । आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्वर रेड्डी बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त एमसीव्ही महेश्वर रेड्डी बदलून येत आहेत. शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी सायंकाळी भारतीय व राज्य पोलिस सेवेतील अनेक अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यात जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांचीही बदली झाली आहे.
शिवाय चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांची पुणे ग्रामीण अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य मुंबई सायबर सेलच्या कविता नेरकर बदलून येत आहेत.
Discussion about this post