मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढे महायुतीतील घटक पक्षाच्या कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला एकमेकांच्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मागच्या काही दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये प्रवेश घेतला. यातच महायुतीमधील घटक पक्षातील नेते पदाधिकारी देखील एकमेकांच्या पक्षात प्रवेश करताना दिसून आले. यामुळे अनेकदा वादही समोर आला. नुकतीच नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणूक लवकरच लागणार आहे. त्यापूर्वी महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत महायुतीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे. त्यात यापुढे महायुतीतील कोणत्याही नेत्याला, पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला दुसऱ्या पक्षात घ्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे. विरोधकांमध्ये कोणालाही फोडल्यास पक्षात प्रवेश द्यायला काही हरकत नाही. मात्र भाजपने शिंदेसेना आणि राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही. अशाप्रकारे अन्य दोन्ही घटक पक्षांनी भाजपच्या लोकांना पक्षात घ्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post