मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १३ व्या दिवशी आज राज्यामध्ये नवं सरकारची स्थापना होत आहे. आज राज्याचे मुंख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे ३१ वे म्हणून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. तर अजित पवार उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. अजित पवार हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. अजित पवार हे अधिक वेळा उपमुख्यमंत्री झालेले एकमेव नेते आहेत
महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांची गटनेते म्हणून निवड झाली आणि त्यांच्या नावाला अंतिम मंजुरी देण्यात आली. आज ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात संध्याकाळी ५.३० वाजता फडणवीसांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
Discussion about this post