मुंबई । राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला. तब्बल २३५ जागांवर महायुतीचे उमेदवारांनी विजय मिळवलाय. महायुतीच्या त्सुनामीत मविआ चारीमुंड्या चीत झाली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार हे आता निश्चित झाले असून एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा असताना उद्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. वानखेडे मैदानावर शपथविधीचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडेल,असे बोलले जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांच्यासह केंद्रातील दिग्गज नेते या शपथविधीला हजर राहणार आहे. मुख्यमंत्री कोण होईल? याप्रमाणेच मंत्री कोण कोण होणार? याची चर्चा सुरु आहे. कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याची राज्यात चर्चा सुरु आहे. ज्याचे आमदार जास्त, त्याला जास्त मंत्रिपदे मिळतील, अशी शक्यता आहे. पाहूयात संभाव्य मंत्र्यांची नावे…
भाजप –
देवेंद्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रकांत पाटील
मंगलप्रभात लोढा
रविंद्र चव्हाण
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
आशिष शेलार
गणेश नाईक
प्रवीण दरेकर
राहुल नार्वेकर
गिरीष महाजन
अतुल भातखळकर
नितेश राणे
राहूल कूल
संजय कुटे
माधुरी मिसाळ
पंकजा मुंडे
मंदा म्हात्रे
देवयानी फरांदे
एकनाथ शिंदे शिवसेना –
एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
दादा भुसे
भरत गोगावले
संजय शिरसाट
उदय सामंत
दीपक केसकर
संजय राठोड
शंभूराज देसाई
अब्दुल सत्तार
अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस –
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
आदिती तटकरे
धर्मरावबाबा आत्रम
अनिल पाटील
नरहरी झिरवाळ
आण्णा बनसोडे
Discussion about this post