मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून कर्जमाफीचं अश्वासन देण्यात आलं होतं. महायुतीने दिलेल्या आश्वसनावर घुमजाव केलाय. त्यावर स्वाभामानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर संताप व्यक्त करत महायुतीवर हल्लाबोल केलाय. तुमची औकात नव्हती, तुम्हाला जमत नव्हतं, तर आश्वासन का दिलं? असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला केलाय.
शेतकरी कर्जमाफीवरून प्रहार संघटनेनेकडून सरकारमधील नेत्यांना जाब विचारला जात आहे. त्याचप्रमाणे स्वाभिमानी संघटनेचे नेते महायुतीच्या मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्रमात जाऊन कर्जमाफीचा जाब विचारणार, असा इशारा राजू शेट्टी यांना दिलाय. निवडणुकीच्या काळात महायुतीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हमीभावाच्या २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती, पण दोन्ही घोषणा हवेत विरल्या आहेत. शेतकरी आक्रमक झाले आहेत, असं राजू शेट्टी म्हणालेत.
अजित पवार म्हणतात, आम्ही आता सातबारा कोरा करू शकत नाही, राज्याची तशी स्थिती नाहीये. मग महायुतीने खोटं अश्वासन का दिलं? शेतकऱ्यांना का गंडवलं? राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे तर, शक्तिपीठ सारखे खर्चिक प्रकल्प का लादले जात आहेत? त्यामुळे यापुढे महायुतीच्या नेत्यांना राज्यात फिरणं मुश्किल करू, असं राजू शेट्टी यांनी म्हणालेत. तुमची औकात नव्हती, तुम्हाला जमत नव्हतं, तर आश्वासन का दिलं? असा सवालही राजू शेट्टी यांनी यावेळी केला.
Discussion about this post