Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लाडकींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, बेस्ट प्रवासात ५० टक्के सूट; मुंबईकरांसाठी महायुतीच्या 87 मोठ्या घोषणा, वाचा काय आहे 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 11, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
लाडकींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, बेस्ट प्रवासात ५० टक्के सूट; मुंबईकरांसाठी महायुतीच्या 87 मोठ्या घोषणा, वाचा काय आहे 
बातमी शेअर करा..!
मुंबई । मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्या उपस्थितीत वचननामा जाहीर करण्यात आला.
महायुतीच्या या वचननाम्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुंबईतील लाडक्या बहिणींना लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, महिलांना बेस्ट प्रवासात ५० टक्के सूट, पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार या सारख्या अनेक घोषणा महायुतीकडून करण्यात आल्या. या जाहीरनाम्यात मुंबईकरांना नेमकी काय आश्वासनं देण्यात आली आहेत ते जाणून घ्या..
मुंबईकरांसाठी महायुतीच्या 87 मोठ्या घोषणा
  1. ९ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण
  2. काँक्रिटी रस्त्यांचे खोदकाम टाळण्यासाठी डक्ट बसवणार
  3. प्रायवेट ले आऊटच्या रस्त्यांचे डांबरीकरण करणार
  4. रस्ते खोदावे लागणाऱ्या १७ सेवांसाठी युटिलिटी टनेल उभारणार
  5. रस्त्यांसंबंधीच्या सूचना डिजीटल फलकाद्वारे देणार
  6. सर्व फुटपाथ स्टँप्ड काँक्रिटचे करणार
  7. पात्र फेरीवाल्यांचे हॉकिंग झोन्समध्ये पुनर्वसन करणार
  8. रस्त्यांवरच्या पार्किंगसाठी कम्युनिटी पार्किंग सुरू करणार
  9. रस्त्यांवर रिक्षा आणि दुचाकींसाठी पार्किंग सुरु करणार
  10. भुयारी आणि जमिनीवर नवे पार्किंग स्थळ उभारणार
  11. सर्व मोकळ्या जागांची देखभाल महापालिकेकडूनच करणार
  12. संपूर्ण मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणार
  13. मुंबईचा पाणीपुरवठा ३८०० एमएलडी वरुन ४७०० एमएलडीवर नेणार
  14. पुढील पाच वर्षे पाणीपट्टी स्थिर, वर्षाला ८ टक्क्यांची पाणीवाढ स्थगित
  15. मुंबईचे सर्व रस्ते कचरामुक्त करणार
  16. झोपडपट्य्यांतील कचऱ्यांसाठी छोट्या गाड्या पुरवणार
  17. मागेल त्याला शौचालय धोरण राबवणार
  18. कामगार भरती करुन सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणार
  19. झिरो वेस्ट वॉर्ड विकसित करणार
  20. निर्माणाधीन सांडपाणी प्रक्रल्प वेळेत पूर्ण करणार
  21. सांडपाणी वाहिन्या आधुनिक करणार
  22. हवा प्रदूषण रोखण्यासाठी सर्वसमावेशक पर्यावरणीय धोरण
  23. १७ हजार कोटी रुपयांची पर्यावरण संवर्धन योजना राबवणार
  24. जपानी तंत्रज्ञान वापरुन मुंबईला पाच वर्षात पूरमुक्त करणार
  25. पूर रोखण्यासाठी ४ नवीन भूमिगत फ्लडवॉटर टाक्या उभारणार
  26. हवेचा दर्जा तपासणाऱ्या स्टेशनांची संख्या दुप्पट करणार
  27. आयआयटी आणि व्हीजेटीआय (VJTI) च्या मदतीने ‘सी व्ह्युईंग डेक’ बनवणार
  28. संपूर्ण शहरात झाडे आणि ग्रीन झोनची संख्या वाढवणार
  29. दर्जेदार शिक्षणासाठी महापालिका शाळांचे स्तर आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत उंचावणार
  30. महानगरपालिकेच्या सर्व शाळामध्ये AI लॅब्स तयार करणार.
  31. मनपाच्या रुग्णालयांचा दर्जा एम्स (AIIMS) च्या धर्तीवर सुधारणार
  32. प्रत्येक प्रशासकीय वॉर्डमध्ये डायलिसिस सेंटर आणि केमोथेरपी सेंटर उभे करणार
  33. ६० वर्षांवरील नागरिकांना वर्षातून एकदा मोफत पूर्ण शरीर तपासणी
  34. ‘मुंबईकर हेल्थ कार्ड’ निर्माण करुन प्रत्येक मुंबईकराचा वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात जतन करणार
  35. प्रत्येक वॉर्डात ३०-४० प्रकारच्या रक्त चाचण्या, औषधे आणि प्राथमिक उपचार मोफत देणारी केंद्रे उभारणार
  36. मधुमेह,रक्तदाब, कर्करोगाची मोफत तपासणी करणारे फिरते दवाखाने सुरु करणार
  37. पालिकेच्या रुग्णालयांबाहेर 24 तास चालणारी स्वस्त दरातली जेनेरिक औषधे देणार
  38. केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयांना संलग्न परिधीय रुग्णालये उभारणार
  39. सर्विकल आणि ब्रेस्ट कॅन्सरची मोफत तपासणी करणार
  40. टाटा हॉस्पिटलच्या धर्तीवर मनपाचे कॅन्सर रुग्णालय उभारणार, केमोथेरपी आणि रेडिएशन मोफत देणार
  41. मुंबई मधुमेहमुक्त करणार
  42. हृदयरुग्णांसाठी खास हॉस्पिटल, सवलतीच्या दरात अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी करणार
  43. कॅन्सर रुग्णांसाठी नायर रुग्णालयात १० मजली रुग्णालय उभारणे सुरू, ते अत्याधुनिक व्यवस्थांनी युक्त असेल, सुपर स्पेशालिटी सेंटरही उभारणार
  44. मुंबईत वैद्यकीय शिक्षण क्षमता दुप्पट करणार
  45. प्रत्येक मोठ्या BMC रुग्णालयात नवीन वैद्यकीय कॉलेज/PG इन्स्टिट्यूट उभारणार
  46. Med Tech च्या धर्तीवर प्रशिक्षण देणारे हॉस्पिटल्स वाढवणार
  47. ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी ऑन कॉल रुग्णवाहिका व रुग्णांच्या निवासस्थानी डॉक्टर तपासणी
  48. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधी उभारणार, ५० हजारांपर्यंतची मदत करणार
  49. मुंबईतील सर्व भाजी मंडई यांचे नूतनीकरण व पुनर्विकास करणार
  50. बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
  51. संपूर्ण मुंबईमध्ये LUX सर्वे करणार
  52. गोराई/मनोरी गावांचा विकास आराखडा तयार करणार
  53. झोपु योजनेत सध्या १७ प्रकल्पांचा समावेश, संख्या अजून वाढवणार
  54. प्रकल्प बाधितांसाठी घरे उपलब्ध करून देणार
  55. २० हजार इमारतींचे रखडलेले भोगवटा प्रमाणपत्र (OC) तात्काळ देणार
  56. सफाई कामगारांना हक्काची घरे देणार
  57. शासकीय,निमशासकीय, मनपा कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवणार
  58. बेस्ट बस प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणार
  59. बेस्टच्या ताफ्यात २०२९ पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक राहतील
  60. बेस्ट बसेसची संख्या ५ हजारांवरून १० हजारांवर नेणार
  61. सर्व बस थांब्यांवर डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि वाय-फाय सुविधा देणार
  62. बेस्ट डेपोमध्ये वाचनालये उभारणार
  63. आगीच्या ठिकाणी अग्निशमन दल ५ मिनिटांत पोहचेल अशी व्यवस्था उभारणार
  64. उंच इमारतींच्या आगीच्या सर्वेक्षण,बचावासाठी थर्मल कॅमेऱ्यांचे ‘फायर सर्व्हिलन्स ड्रोन्स’चा वापरणार
  65. सर्व गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक इमारतींना ‘डिजिटल फायर ऑडिट’ सक्तीचे करणार
  66. प्रत्येक प्रशासकीय वॉर्डात जागतिक दर्जाचे स्पोर्ट कॉम्प्लेक्स व स्विमिंग पूल बांधणार
  67. ३ विभागांत स्टार्ट अप, इन्नोवेशन हब उभारण्यासाठी १०० कोटी देणार
  68. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी प्रत्येक वॉर्डात वातानुकूलित, वाय-फाय सज्ज आणि चोवीस तास सुरू राहणाऱ्या अभ्यासिका उभारणार
  69. लाडक्या बहिणींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार
  70. महिला बचत गटांच्या वस्तू विकण्याकरिता ई-मार्केट स्थापन करणार
  71. कामकरी महिलांसाठी प्रत्येक वॉर्डात परवडणाऱ्या दरांतली पाळणाघरे उभारणार
  72. मुंबईत महिलांसाठी मुबलक शौचालय बांधणार
  73. महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज
  74. ‘मुंबई डिजिटल सखी’ अंतर्गत महिलांना एआय, कोडिंग आणि ऑनलाइन मार्केटिंगचे मोफत प्रशिक्षण
  75. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘रात्रीचे गस्त पथक’ आणि त्वरित मदतीसाठी वन-टॅप मोबाईल अॅप बनवणार
  76. सार्वजनिक ठिकाणांवर, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, पार्क आणि हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी सुरक्षा वाढवणार
  77. मुंबई रोहिंग्या व बेकायदेशीर बांगलादेशी मुक्त करणार
  78. मराठी भाषेच्या संवर्धन,प्रसारासाठी स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापणार
  79. प्रत्येक विभागात मराठी नाटक, लोककला आणि साहित्यासाठी सुसज्ज ‘मराठी कला केंद्र’ आणि अभ्यासिका
  80. फक्त मराठी चित्रपटांकरीता खास मराठी मल्टिप्लेक्स उभारणार
  81. मराठी कलाकारांच्या संस्थांना महापालिकेतर्फे पाठबळ देणार
  82. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रम राबवणार
  83. मराठी तरुणांसाठी शिक्षण-रोजगार-उद्योजक यांच्याकरिता धोरण राबवण्यात येईल
  84. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारणार
  85. मराठी तरुणांसाठी मुंबई Fellowship सुरू करणार
  86. परवडणाऱ्या घरांचे धोरण राबवून मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून रोखणार
  87. ईस्टर्न फ्री वे घाटकोपरच्या पुढे ठाण्यापर्यंत नेणार
बातमी शेअर करा..!
Previous Post

 राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीबाबत कोर्टातून मोठी अपडेट समोर 

Next Post

महाराष्ट्रातील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात मोठी पदभरती ; 10वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

महाराष्ट्रातील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात मोठी पदभरती ; 10वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026
रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 21, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page