जळगाव । देशासह राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वच पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. नुकतीच भाजपने पहिल्या १९५ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. मात्र यात महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचा समावेश नाहीय. यातच सत्तेतील महायुतीकडून अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटला नाहीय. अशातच उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव व रावेरपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकते. मात्र, जागेबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, उमेदवारी मिळाली नाही तरी महायुतीच्या उमेदवाराचे काम करू अशी प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली, सुप्रिया सुळे यांनी सर्व भ्रष्टाचारी भाजपत गेले असल्याचे वक्तव्य केले होते.
त्याबाबत मंत्री पाटील यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, ‘ताईना काही महिन्यांपूर्वी ही आठवण झाली. काही वर्षापर्यंत ही आठवण स्मरणात राहिली असती. बारामती मतदार संघात सुनेत्रा पवार यांनी लोकसभेची उमेदवारी करण्याची मागणी होत आहे. त्यांनी पडद्यामागे खूप सामाजिक काम केलेले आहे. बारामती मतदारसंघात महायुतीचा
उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, महामार्गावर अपघात झाल्यानंतर ग्रामस्थ सर्वप्रथम मदतीला धावतात. मात्र, त्यांच्याकडे बचाव साहित्य काहीच नसते. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना मदत करता येत नाही. त्यामुळे महामार्गालगतची व नदीकाठच्या गावांना आपत्तीत मदत करता येईल अशी कीट मदत व पुनर्वसन विभागामार्फत तयार केले जात आहे असेही त्यांनी सांगितले















Discussion about this post