मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरच्या एका प्रचारसभेत महायुतीच्या वतीने जाहीरनामा जाहीर करण्यात आला असून यात 10 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यात महिला, शेतकऱ्यांसह विविध वर्गांना लाभ देणाची घोषणा करण्यात आली आहे
तर लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ही योजना महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते.
शेतकऱ्यांसाठी घोषणा
या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या हितासाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, तसेच शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये देण्यात येतील, जे आतापर्यंत 12,000 रुपये होते. याव्यतिरिक्त, MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन दिले गेले आहे.
वीज बिलात कपात
वीज बिलात 30% कपात करण्याची घोषणा देखील केली गेली आहे. ही कपात राज्यातील नागरिकांच्या आर्थिक भार कमी करण्यास मदतील होईल. मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले की सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल.
इतर घोषणा
– महिला सुरक्षा : 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्यात येणार.
-वृद्ध पेन्शन : वृद्ध पेन्शन धारकांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन
-रोजगार निर्मिती : 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचे वचन, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन देण्याची घोषणा केली गेली आहे.
– ग्रामीण विकास : 45,000 गावांत पांदण रस्ते बांधण्याचे आश्वासन
– अंगणवाडी आणि आशा सेविका : अंगणवाडी आणि आशा सेविकांना दरमहा 15,000 रुपये वेतन आणि संरक्षण देण्याचे आश्वासन दिले गेले आहे.
– सरकारी धोरण : सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029’ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन दिले गेले आहे.