मुंबई । लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव स्विकारावा लागला. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. भाजपने एकट्याने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. हा विजय अत्यंत मोठा मानला जात आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने नव्याने पक्ष उभारणीसाठी काम केलं. प्रचार केला, ग्राऊंड लेव्हलला काम केलं, लोकांपर्यंत पोहोचले, त्याचाच फळ त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळताना दिसत आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागांवर यश मिळाले असून यामुळे आता राज्यात महायुतीचेच सरकार येणार हे स्पष्ट झाले असून मात्र मुख्यमंत्री कोण होणार याकडे अख्या राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नावं निश्चित? एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अजित पवार यांच्यात आज संध्याकाळी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आता मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजपकडून हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा आहे. भाजपाच्या पाठिंब्यामुळे चार सहयोगी पक्षतील आमदार निवडून आले. विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठिंबा आहे. 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 137 वर पोहोचली आहे. महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती देण्यात आली आहे. भाजपनं आपल्या कोट्यातून ४ जागा मित्र पक्षांना सोडल्या होत्या, त्यापैकी ३ जागांवर विजय झाला असून तिन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
Discussion about this post